स्मार्ट ग्राम तिरखेडी येथे भव्य आरोग्य तपासणी शिविर संपन्न
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत 25 जानेवारी 2026 रोजी स्मार्ट ग्राम पंचायत तिरखेडी च्या वतीने न्यू गोंदिया हॉस्पिटल च्या मदतीने भव्य आरोग्य तपासणी व महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्मान योजना नोंदणी शिविर चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सरपंच प्रिया मनोज शरणागत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विमल बबलू कटरे यांनी वृक्षाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन केले. या प्रसंगी ज्ञानिदास महाराज, राजेंद्र पटले पोलीस पाटील, डा विमलेश अग्रवाल, उषा अग्रवाल व संपूर्ण न्यू गोंदिया हॉस्पिटल टीम, सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी संपूर्ण नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचे मार्गदर्शन, आरोग्य तपासणी व आरोग्य योजना कार्ड नोंदणी करण्यात आली.सरपंच प्रिया मनोज शरणागत व जी.प.सदस्य विमल कटरे यांनी याबाबद महिलांशी हितगुज साधले. या शिविरात ग्राम पंचायत मधील एकुण 215 महिला भगिनींनी तसेच नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून या कार्यक्रमात भाग घेतला.